Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Paper

Talathi Practice Paper 37 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३७

शेअर करा:WhatsApp
Talathi Practice Paper 37 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३७

Talathi Practice Paper 37 | Talathi Practice Question Paper Set 37

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३७

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

इथे जन्माचा सोहळा नाही की मरणाचे दुःख नाही.

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

Answer: (C) संयुक्त वाक्य

2) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा.

किरकोळ –

(A) ठसठशीत

(B) स्पष्ट

(C) तुटपुंजे

(D) घाऊक

Answer: (D) घाऊक

3) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.

चौकोन कधी वर्तुळाकर असू शकेल का?

(A) चौकोन

(B) वर्तुळकार

(C) शकेल

(D) का

Answer: (B) वर्तुळकार

4) अकबराला ‘ऊंची’ अत्तरे आवडत. यातील ऊंची या शब्दाचा अर्थ-

(A) उंचपणा

(B) मौल्यवान

(C) जड

(D) सुगंधित

Answer: (B) मौल्यवान

5) पुढील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. गरीब व्हावे असे कोणाला वाटते?

(A) गरीब व्हावे असे एखाद्याला वाटत नाही.

(B) गरीब व्हावे असे आम्हाला वाटत नाही.

(C) गरीब व्हावे असेच सर्वांना वाटते.

(D) गरीब व्हावे असे कोणालाही वाटत नाही.

Answer: (D) गरीब व्हावे असे कोणालाही वाटत नाही.

6) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा, ‘अरेरे! किती दुःखद अंत झाला त्याचा!’

(A) शब्दयोगी अव्यय

(B) क्रियाविशेषण अव्यय

(C) केवलप्रयोगी अव्यय

(D) उभयान्वयी अव्यय

Answer: (C) केवलप्रयोगी अव्यय

7) गटात न बसणारा पर्याय निवडा.

(A) स, ला, ते

(B) नो

(C) चे, च्या, ची

(D) स, ला, ना, ते

Answer: (A) स, ला, ते

8) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

ऊन रखरखीत X

(A) तापते

(B) सौम्य

(C) भाजणारे

(D) पोळणारे

Answer: (B) सौम्य

9) दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळाला. (विध्यर्थ)

(A) मिळवतो

(B) मिळावा

(C) मिळवतील

(D) मिळवले

Answer: (B) मिळावा

10) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.

भारनियमनामुळे विद्युत पुरवठा खंडित होणे ही आजकाल नेहमीचीच बाब झाली आहे.

(A) क्रियाविशेषण अव्यय

(B) शब्दयोगी अव्यय

(C) उभयान्वयी अव्यय

(D) केवलप्रयोगी अव्यय

Answer: (A) क्रियाविशेषण अव्यय

विभाग-२ इंग्रजी

11) Identify the figure of speech in the following sentence:

India is a melting pot of culture.

(A) Apostrophe

(B) Simile

(C) Metaphor

(D) Oxymoron

Answer: (C) Metaphor

12) Pick the Synonym for the word

Fury

(A) Indignation

(B) Calm

(C) Praise

(D) Help

Answer: (A) Indignation

13) Find the meaning of the highlighted word in the sentence:

He was trying to banish all feelings of guilt

(A) Eliminate

(B) Accept

(C) Include

(D) Admit

Answer: (A) Eliminate

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

In order to thwart the advancing enemy troops, the captain ordered the explosives team to destroy the bridge

(A) To hate something a lot

(B) To stop something from happening

(C) To be happy for something to happen

(D) To help in making something happen

Answer: (B) To stop something from happening

15) Pick the Synonym for the word:

Eradicate

(A) Eliminate

(B) Disapprove

(C) Wasteful

(D) Spread

Answer: (A) Eliminate

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:

Of the two, the latter is far better than the former.

(A) Earlier

(B) Second

(C) Superior

(D) Prominent

Answer: (B) Second

17)  Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence:

If ———– is low, they will cancel the class.

(A) enrolling

(B) enrollee

(C) enrollment

(D) enrolled

Answer: (C) enrollment

18) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:

The thief took to his heels as soon as he saw the police.

(A) hurt him self

(B) argued with policemen

(C) stopped stealing

(D) ran away

Answer: (D) ran away

19) Choose the appropriate preposition for the given sentence:

The ball fell —–the pond as Amala missed flinging it ———- Shashi.

(A)in, at

(B) into, to

(C) on, after

(D) into, for

Answer: (B) into, to

20) Choose the option that has the correct spelling.

(A) Admirel

(B) Admiral

(C) Admeral

(D) Admirle

Answer: (B) Admiral

विभाग-३ गणित

21) जर एक व्यक्ती 10 किमी/तास ऐवजी 14 किमी तासाने चालत असेल, तर तो 20 किमी अधिक चालला असेल, त्याच्याद्वारे कापलेले वास्तविक अंतर काय होते?

(A)80 किमी

(B)70 किमी

(C)60 किमी

(D) 50 किमी

Answer: (D) 50 किमी

22) एका बॉक्समध्ये 8 पांढरे, 7 काळे आणि 6 पिवळे चेंडू आहेत. यादृच्छिकपणे एक चेंडू उचलला. तो पांढरा किंवा पिवळा नसण्याची संभाव्यता काय आहे?

(A)8/21

(B)21/8

(C)1/3

(D)21/5

Answer: (C)1/3

23) जर मालाची किंमत 25% नी वाढवली तर त्याचा खर्च 15% नी वाढतो, त्या व्यक्तीला 4 किग्रॅ माल कमी मिळतो. मालाचे मूळ प्रमाण काढा (किग्रॅमध्ये).

(A)50

(B)54

(C)45

(D)40

Answer: (A)50

24) अरुण नऊ दिवसांपूर्वी सिनेमाला गेला. तो फक्त गुरूवारी सिनेमा पाहायला जातो. आज आठवड्याचा कोणता दिवस आहे?

(A) शनिवार

(B) रविवार

(C) सोमवार

(D) मंगळवार

Answer: (A) शनिवार

25) ‘जर ‘A’= 26, SUN = 27, तर CAT =?

(A)24

(B)57

(C)58

(D)27

Answer: (B)57

26) प्रश्न चिन्हाच्या जागी काय यायला हवे?

BEF, DGH, FIJ, HKL,?

(A)MPQ

(B)JMN

(C)JLM

(D)LIM

Answer: (B)JMN

27) फासा दोन वेळा फेकल्यास बेरीज 8 मिळण्याची संभाव्यता काय आहे?

(A)5/36

(B)7/36

(C)4/9

(D)9/4

Answer: (A)5/36

28) सोडवा 2418 = (78×30) +?

(A)78 x 2

(B)78

(C)78 x 3

(D)78 x 30

Answer: (B)78

29) 21.40 रुपये प्रति किलोग्रॅमने मिश्रणाची विक्री करण्यासाठी, 18.20 रुपये प्रति किलोग्रॅम आणि 23.80 रुपये प्रति किलोग्रॅमच्या तांदळांना किती गुणोत्तरामध्ये मिसळले जावे?

(A)3:7

(B)3:4

(C)2:5

(D) 4:7

Answer: (B)3:4

30) एक दुकानदार प्रत्येकी 35 रुपये या दराने मार्करची विक्री करतो आणि त्याला 10% कमिशन मिळते. तो प्रत्येकी 65 रुपयांच्या दराने जेल पेनचीही विक्री करतो आणि त्याला 20% नफा मिळतो. जर त्याने दिवसाला 12 मार्कर्स आणि 8 जेल पेन्सची विक्री केली तर 2 आठवड्यांमध्ये त्याला मिळणाऱ्या कमिशनची रक्कम काय असेल (रुपयांमध्ये)?

(A) 2100

(B)1850

(C)2044

(D)2680

Answer: (C) 2044

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारताच्या संविधानाचे कोणते कलम राज्याच्या राज्यपालाद्वारे अध्यादेश जारी करण्याबाबत हातळणी करते?

(A) कलम 262

(B) कलम 213

(C) कलम 110

(D) कलम 68

Answer: (B) कलम 213

32) भारतीय घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जम्मु आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला गेला आहे?

(A)270

(B)275

(C)280

(D)370

Answer: (D)370

33) खालीलपैकी कुणाला 2017-2018 वर्षासाठी खेळाडूंच्या श्रेणीमध्ये शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले?

(A) दिव्या देशमुख

(B) स्मृति मंधाना

(C) अजिंक्य रहाणे

(D) रोहित शर्मा

Answer: (B) स्मृति मंधाना

34) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे.

(A) कैनडा

(B) युनायटेड किंगडम

(C) ऑस्ट्रेलिया

(D) जर्मनी

Answer: (C) ऑस्ट्रेलिया

35) भारतात मिश्मी पर्वत रांगा कुठे आहेत?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) महाराष्ट्र

(C) उत्तराखंड

(D) आंध्र प्रदेश

Answer: (A) अरुणाचल प्रदेश

36) (आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत जन माहिती अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती दंड केला जाऊ शकतो?

(A) 10,000 रुपये

(B)25, 000 रुपये

(C) 15,000 रुपये

(D)5, 000 रुपये

Answer: (B)25, 000 रुपये

37) महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम, 2015 चे कोणते कलम न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अडथळा करते?

(A) 23

(B)24

(C)25

(D)26

Answer: (D)26

38) सूरत हे ———- नदीच्या काठावर वसलेले आहे.

A नर्मदा

(B) गोदावरी

(C) माही

(D) तापी

Answer: (D) तापी

39) परिसंस्थेचा सजीव भाग ———- म्हणून संदर्भित आहे.

(A) अजैविक घटक

(B) जैविक घटक

(C) सेंद्रिय घटक

(D) असेंद्रिय घटक

Answer: (B) जैविक घटक

40) जीवांच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या ————- ह्या आहेत.

(A) आनुवंशिक

(B) प्रजाती

(C) परिसंस्था

(D) वरीलपैकी सर्व

Answer: (D) वरीलपैकी सर्व


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 14 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 14 व्हिडिओ वर्णनासह

13 Jul 2023
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह
Practice Paper

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 13 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 13 व्हिडिओ वर्णनासह

11 Jul 2023
DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15
Practice Paper

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15

12 Jun 2023
Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२
Practice Paper

Talathi Practice Paper 42 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४२

22 Apr 2023