Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Godavari River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “गोदावरी नदी” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

शेअर करा:WhatsApp
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQ Questions and Answers on “Godavari River” For Various Competitive Exams

“Indian rivers”, an important role in all government, bank and other similar competitive exams. So, knowing the facts about rivers in India is very important for primary to high school students and also candidates preparing for competitive exams.

Here, we have collected the most important questions on Indian rivers and answers with clear Answers. Practice these MCQ Questions and Answers and score well in competitive exams.

Today we Deal with MCQ Questions and Answers on “Godavari River”

 

(Q1) महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणत्या नदीचे आहे ?
(A) गोदावरी
(B) तापी
(C) कृष्णा
(D) कोयना
Ans-(A) गोदावरी

(Q2) गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) सांगली
(D) सातारा
Ans-(A) नाशिक

(Q3) महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम कोणत्या डोंगररांगावर होतो?
(A) ब्रह्मगिरी
(B) गाळणा
(C) अजिंठा
(D) हरिश्चंद्र
Ans-(A) ब्रह्मगिरी

(Q4) गोदावरी नदीची संपूर्ण भारतातील एकूण लांबी किती किमी आहे?
(A) 1465 किमी
(B) 1365 किमी
(C) 1100 किमी
(D) 3200 किमी
Ans- (A) 1465 किमी

(Q5) महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे असलेल्या गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे?
(A) 512 किमी
(B) 568 किमी
(C) 668 किमी
(D) 612 किमी
Ans- (C) 668 किमी

(Q6) गोदावरी नदी वाहण्याच्या दिशावरून खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते?
(A) पूर्व वाहिनी
(B) पश्चिम वाहिनी
(C) दक्षिण वाहिनी
(D) उत्तर वाहिनी
Ans-(A) पूर्व वाहिनी

(Q7) गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) महाराष्ट्र
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q8) गोदावरीची उपनदी दक्षिण पूर्णा ही कोठे उगम पावते ?
(A) अजिंठा डोंगर रांगेत
(B) सातपुडा डोंगर रांगेत
(C) हरिश्चंद्र बाळघाट डोंगर रांगेत
(D) चिरोली डोंगर रांगेत
Ans-(A) अजिंठा डोंगर रांगेत

(Q9) गोदावरी नदीची उपनदी मांजरा ही कोठे उगम पावते?
(A) बालाघाट डोंगर
(B) गाळणा डोंगर
(C) सातपुडा डोंगर
(D) महादेव डोंगर
Ans-(A) बालाघाट डोंगर

(Q10) गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्रातील किती चौ.कीमी क्षेत्र व्यापले आहे?
(A) 69899 चौ.कीमी
(B) 69000 चौ.कीमी
(C) 59899 चौ.कीमी
(D) 59000 चौ.कीमी
Ans-(B) 69000 चौ.कीमी

(Q11) गोदावरी नदीची महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता किती टीएमसी आहे ?
(A) 202 टीएमसी
(B) 102 टीएमसी
(C) 502 टीएमसी
(D) 404 टीएमसी
Ans- (D) 404 टीएमसी

(Q12) गोदावरी नदीने भारतीय नदी प्रणालीचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
(A) 10%
(B) 15%
(C) 18%
(D) 20%
Ans-(A) 10%

(Q13) गोदावरी नदीने महाराष्ट्र नदी प्रणालीचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे?
(A) 29%
(B) 25%
(C) 39%
(D) 49%
Ans-(D) 49%

(Q14) महाराष्ट्रात उगम पावणारी गोदावरी नदी कोणत्या सागराला जाऊन मिळते ?
(A) अरबी समुद्र
(B) बंगालचा उपसागर
(C) हिंदी महासागर
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) बंगालचा उपसागर

(Q15) महाराष्ट्रात उगम पावणारी गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते?
(A) राजमहेंदरी
(B) विजयवाड़ा
(C) तिरुपती
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) राजमहेंदरी

(Q16) गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे आहे या नदीला काय म्हणून ओळखले जाते?
(A) दक्षिण भारताची गंगा
(B) दक्षिण भारताची सिंधू
(C) उत्तर भारताची गंगा
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) दक्षिण भारताची गंगा

(Q17) गोदावरी नदी ही भारतीय उपखंडातील सर्वात जुनी नदी असल्यामुळे गोदावरी नदीला काय म्हणतात?
(A) भागीरथी
(B) प्राचीनगंगा
(C) वृद्धगंगा
(D) गोमती
Ans-(C) वृद्धगंगा

(Q18) गोदावरी नदीची उपनदी प्रवरा कोणत्या ठिकाणी उगम पावते?
(A) हरिश्चंद्रगड
(B) ब्रह्मगिरी
(C) त्र्यंबकेश्वर
(D) भीमाशंकर
Ans-(A) हरिश्चंद्रगड

(Q19) गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर भंडारदरा येथे विल्सन प्रकल्प उभारण्यात आला आहे?
(A) मुळा
(B) मुठा
(C) इंद्रायणी
(D) प्रवरा
Ans-(D) प्रवरा

(Q20) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
(A) कृष्णा
(B) कोयना
(C) गोदावरी
(D) भद्रा
Ans-(C) गोदावरी

(Q21) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे ?
(A) जायकवाडी
(B) उजनी
(C) येलदरी
(D) सिद्धेश्वर
Ans-(A) जायकवाडी

(Q22) गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी बांधण्यात आले आहे ?
(A) गंगापूर
(B) पैठण
(C) वैजापूर
(D) खुलताबाद
Ans-(B) पैठण

(Q23) गोदावरी नदीवरील जायकवाडी या धरणाचे काय नाव आहे ?
(A) शिवसागर
(B) यशवंतसागर
(C) नाथसागर
(D) आनंदसागर
Ans-(C) नाथसागर

(Q24) गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) सोलापूर
(D) सांगली
Ans-(A) नाशिक

(Q25) खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाही?
(A) पैठण
(B) नांदेड
(C) गंगाखेड
(D) सातारा
Ans-(D) सातारा

(Q26) गोदावरी व दारणा नदीचा नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संगम झाला आहे?
(A) सायखेडा
(B) कुंडलवाडी
(C) जोगेश्वरी
(D) पैठण
Ans-(A) सायखेडा

(Q27) गोदावरी व खाम नदीचा संगम औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे?
(A) जोगेश्वरी
(B) गंगापूर
(C) पैठण
(D) म्हैसमाळ
Ans-(A) जोगेश्वरी

(Q28) मांजरा व गोदावरी नदीचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे ?
(A) विष्णुपुरी
(B) कुंडलवाडी
(C) वैजापूर
(D) पैठण
Ans-(B) कुंडलवाडी

(Q29) मांजरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे या नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे?
(A) कळंब
(B) रिसोड
(C) सेनगाव
(D) वाशिम
Ans-(A) कळंब

(Q30) नांदूर मधमेश्वर हे धरण गोदावरी नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) नाशिक
(B) औरंगाबाद
(C) नांदेड
(D) परभणी
Ans-(A) नाशिक

(Q31) विष्णुपुरी व बाभळी ही दोन धरणे गोदावरी नदी खोऱ्यातील असून कोणत्या जिल्ह्यात आहेत?
(A) नाशिक
(B) परभणी
(C) नांदेड
(D) जालना
Ans- (C) नांदेड

(Q32) खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीला उजव्या बाजूला येऊन मिळत नाही ?
(A) दारणा
(B) मांजरा
(C) शिवना
(D) प्रवरा
Ans- (C) शिवना

(Q33) खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीला डाव्या बाजूला येऊन मिळत नाही?
(A) कादवा
(B) शिवना
(C) प्रवरा
(D) खाम
Ans- (C) प्रवरा

(Q34) खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीला उजव्या बाजूला येऊन मिळते ?
(A) दारणा
(B) प्रवरा
(C) बोरा
(D) वरीलपैकी सर्व
Ans- (D) वरीलपैकी सर्व

(Q35) गोदावरी नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे जी उजव्या बाजूने येऊन गोदावरीला मिळते?
(A) मांजरा
(B) सिंदफणा
(C) बोरा
(D) नेवासा
Ans- (A) मांजरा

(Q36) बालाघाट डोंगररांगेमुळे खालीलपैकी कोणते नदी खोरे अलग झाले आहेत ?
(A) गोदावरी व भीमा
(B) गोदावरी व तापी
(C) नर्मदा व तापी
(D) भीमा व कृष्णा
Ans- (A) गोदावरी व भीमा

(Q37) गोदावरी नदी खोऱ्याला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते?
(A) नाग भूमी
(B) संतांची भूमी
(C) विदर्भभूमी
(D) देव भूमी
Ans- (B) संतांची भूमी

(Q38) गोदावरी नदी खोऱ्यातील येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत?
(A) हिंगोली
(B) बुलढाणा
(C) नाशिक
(D) नांदेड
Ans- (A) हिंगोली

(Q39) अंबाडी हे धरण गोदावरीच्या कोणत्या उपनदीवर आहे?
(A) गिरजा
(B) सिंदफणा
(C) कुंडलिका
(D) शिवना
Ans- (D) शिवना

(Q40) अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर कोणते धरण आहे?
(A) विष्णुपुरी
(B) भंडारदरा
(C) नांदूर मधमेश्वर
(D) करंजगाव
Ans- (B) भंडारदरा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Rivers in Konkan Region” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “कोकणातील नद्या” या विषयावरील MCQ प्रश्न व उत्तरे

26 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Narmada River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “नर्मदा नदी” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

25 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Wainganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “वैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

22 Aug 2023
MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे
Maharashtra GK Current Affairs

MCQ Questions and Answers on “Painganga River” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “पैनगंगा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

19 Aug 2023