Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 15 Topic:- लीप वर्ष आणि साधे वर्ष

अपडेट 3 Dec 2023
शेअर करा:WhatsApp
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 15 Topic:- लीप वर्ष आणि साधे वर्ष

ZP Bharti Study Material 15 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 15 Topic:- लीप वर्ष आणि साधे वर्ष

प्रश्न १.) जर एका वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर त्या वर्षाचा शेवटचं दिवस कोणता असेल?
a) रविवार
b) सोमवार
c) मंगळवार
d) शनिवार

उत्तर: b) सोमवार

स्पष्टीकरण:

दिलेले वर्ष लीप वर्ष आहे.
म्हणून,
1 जानेवारी = 30 डिसेंबर = रविवार
म्हणून
31 डिसेंबर = सोमवार
म्हणून आपले योग्य उत्तर सोमवार असेल.

प्रश्न 2.) 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता तर त्या वर्षात कोणत वार 53 वेळा आला आहे?
a) सोमवार
b) रविवार
c) सोम व रवी
d) मंगळ व बुध

उत्तर: d) मंगळ व बुध

स्पष्टीकरण :

2008 हे लीप वर्ष आहे.
म्हणून
1 जानेवारी आणि 2 जानेवारी ला असणारा वार 53 वेळा येईल.
13 जानेवारी ल रविवार असेल तर 15 जानेवारीला मंगळवार येईल.
म्हणजे 1 तारखेला सुद्धा मंगळवार असेल.
म्हणून 2 तारखेला बुधवार येईल.
शेवटी 1 आणि 2 जानेवारीला असणारे वार 53 वेळा येतील.
म्हणून मंगळवार आणि बुधवार 53 वेळा येतील.

प्रश्न 4.) जर वर्षाचा पहिला दिवस सोमवार असेल तर 2012 साली एकूण किती गुरुवार असतील?
a) 53
b) 54
c) 52
d) 55

उत्तर: c) 52

स्पष्टीकरण:

2012 लीप वर्ष आहे, म्हणून 1आणि 2 जानेवारी ला जे वार येतील ते 53 वेळा आणि बाकीचे 52 वेळा येतील.
इथे 1 जानेवारी सोमवार म्हंजे 2 जानेवारी मंगळवार, म्हणून सोम आणि मंगळ 53 वेळा येतील तर बाकीचे 52 वेळा येतील.
म्हणून गुरुवार 52 वेळा येईल.

प्रश्न 4.) जर एका साध्या वर्षाचा तिसरा दिवस बुधवार असल तर 29 डिसेंबर ला कोणता वार असेल?
a) मंगळवार
b) सोमवार
c) रविवार
d) शनि वार

उत्तर: d) शनिवार

स्पष्टीकरण:

साधे वर्ष,
1 जानेवारीला जो वार असेल तो 31 डिसेंबर ला असेल.
जर 3 जानेवारी बुधवार असेल तर 1 जानेवारी सोमवार येईल.
म्हणून, 31 डिसेंबर सुद्धा सोमवार असेल.
31 डिसेंबर सोमवार तर 29 डिसेंबर शनिवार असेल.

प्रश्न 5.) वरील प्रश्न मधे दिलेल्या वर्षात सोमवार किती वेळा येईल?
a) 52
b) 53
c) 51
d) 54

उत्तर:b) 53

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे,
वरील प्रश्न मधे साधे वर्ष असून 1 जानेवारीला सोमवार आहे.
आणि साधे वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो तो 53 वेळा येतो.
म्हणून सोमवार 53 वेळा येईल.

प्रश्न 6.) 2016 चे कॅलेंडर पुन्हा कोणत्या वर्षी येईल?
a) 2024
b) 2052
c) 2044
d) 2004

उत्तर: c) 2044

स्पष्टीकरण:

2016 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षाचे कॅलेंडर 28 वर्षानी पुन्हा येते.
म्हणून
2016+28=2044
म्हणून आपले योग्य उत्तर 2044 असेल.

प्रश्न 7.) खालील पैकी कोणते कॅलेंडर हे 2009 या वर्षाच्या कॅलेंडर सारखे असेल?
a) 2014
b) 2015
c) 2013
d) 2016

उत्तर: b) 2015

स्पष्टीकरण:

2009 हे साधे वर्ष आहे.
2009= 2008+1= लीप वर्ष+1
असे आपण लिहू शकतो.
म्हणून 2009 हे वर्ष 6 वर्षानी येईल.
2009+6=2015
म्हणून 2009 या वर्षाचे कॅलेंडर 2015 ला परत येईल.

प्रश्न 8.) 1990 या वर्षाचे कॅलेंडर खालील पैकी कोणत्या कॅलेंडर सारखे असेल?
a) 1999
b) 1988
c) 2000
d) 2001

उत्तर: d) 2001

स्पष्टीकरण:

1990 हे वर्ष साधे वर्ष आहे.
1990=1988+2= LY+2
असे आपण लिहू शकतो.
म्हणून 1990 हे वर्ष 11 वर्षानी पुन्हा येईल.
1990+11=2001
म्हणून आपले योग्य उत्तर 2001 असेल.

प्रश्न 9.) आज रविवार आहे, परवा 13 तारीख होती तर 3 दिवसांनी काय तारीख आणि वार असेल?
a) 16, बुध
b) 17, बुध
C) 15, बुध
d) 18, बुध

उत्तर: d) 18, बुध

स्पष्टीकरण:

परवा 13 तारीख होती म्हणजे आज 15 तारीख असेल आणि आज रविवार आहे.
म्हणून 3 दिवसांनी बुधवार असेल आणि तारीख 18 असेल.
म्हणून आपले योग्य उत्तर 18, बुध असेल .

प्रश्न 10.) सूरज त्याच्या बहीनिपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे आणि त्याच्या बहिणीचा जन्म रविवारी झालं असेल तर सूरज च जन्म कोणत्या दिवशी झालं?
a) शनी वार
b) गुरूवार
c) शुक्रवार
d) रविवार

उत्तर: c) शुक्रवार

स्पष्टीकरण:

सूरज आणि त्याची बहीण यामधे 730 दिवस च अंतर आहे.
म्हणून आपण त्यांच्यातील odd days काढू.
730/7=102 (बाकी =2)
म्हणून आपणास 2 दिवस मागे जावे लागेल, कारण सूरज त्याच्या बहिनीपेक्षा मोठा आहे .
जर बहीण रविवार ला जन्म ली असेल तर 2 दिवस मागे म्हंजे सूरज शुक्रवार ला जन्मला असणार.
म्हणून आपले योग्य उत्तर शुक्रवार असेल.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

14 Nov 2023
ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”

11 Nov 2023