Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Logical Reasoning and syllogism ” problems to ace Reasoning part | या “तर्क व अनुमान” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp

This is the 29 no. topic article on “Logical Reasoning and syllogism” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Tark V Anuman (तर्क व अनुमान)” topic.

तर्क व अनुमान (Logical Reasoning and syllogism ):

अशा प्रकारच्या घटका मधे आपणास दिलेल्या प्रश्ना तील माहिती वरून तर्क लावून निष्कर्ष काढायचा असतो. हा तर्क लावत असताना कधी आपणास आकृती काढावी लागते व त्यावरून वेगवेगळे निष्कर्ष काढून शेवटी योग्य ते उत्तर शोधावे लागते. अशी प्रश्न खूप सोपी व सोबतच कन्फ्युज करणारी असतात. त्यामुळे वाचन कौशल्य अचूक असणे गरजेचे असते.
दिलेल्या विधान वरून आपणास तर्क आकृती काढता येणे सर्वात महत्वाचे आहे. तरच आपण अचूक निष्कर्ष काढू शकतो.
त्यासाठी आपण खालील विधान व त्यावरून काढलेली तर्क आकृती बघू.

१.) सर्व A हे B आहेत.

वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो.

२.) एकही A हा B नाही.
वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो. ज्या एकमेकींना कुठेच छेदत नाहीत.

३.) काही A हे B आहेत.
वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो आणि त्या दोन अकृतींचा कॉमन भाग हा दिलेले विधान दर्शवतो.

४.) काही A हे B नाहीत.
वरील विधान दिले असता आपण खाली दिल्या प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो. ज्यात त्या दोन अकृतीचा कॉमन भाग आहे तो दिलेले विधान दर्शवतो.

याप्रमाणे जर आपण दिलेल्या विधान वरून तर्क आकृत्या काढल्या आणि त्यावरून निष्कर्ष काढून योग्य उत्तर शोधू शकतो. त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रश्न सराव करणे आवश्यक आहे. खाली दिलेली काही उदाहरणे आपण अभ्यासू.

Note: अशा प्रकारच्या तर्क शास्त्रीय प्रश्न मधे दिलेली माहिती वास्तव घटनांसोबत कितीही विसंगत असेल तरीही ती पुर्णत: सत्य समजून निष्कर्ष काढायचा असतो.

उदाहरणे:

1.) विधाने:
१) सर्व ससे कासव आहेत.
२) सर्व कासव मगर आहेत.

निष्कर्ष:
१) काही मगर ससे आहेत.
२) काही मगर कासव आहेत.

a) फक्त निष्कर्ष १ सत्य असेल.
b) फक्त निष्कर्ष २ सत्य असेल.
c) निष्कर्ष १ किंवा २ सत्य
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही असत्य असतील.
e) दोन्ही निष्कर्ष सत्त्य असतील.

उत्तर: e)

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे तर्क आकृती काढू शकतो आणि त्यावरून असा निष्कर्ष निघतो की काही मगर ससे आहेत आणि काही मगर कासव आहेत.

म्हणून दोन्ही निष्कर्ष येथे सत्य आहेत. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय e) असेल.

2.) विधाने:

१) सर्व गायी बैल आहेत.
२) सर्व म्हशी बैल आहेत.

निष्कर्ष:

१) सर्व गायी म्हशी आहेत.
२) सर्व म्हशी गायी आहेत.

a) फक्त निष्कर्ष १ सत्य असेल.
b) फक्त निष्कर्ष २ सत्य असेल.
c) निष्कर्ष १ किंवा २ सत्य
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही असत्य असतील.
e) दोन्ही निष्कर्ष सत्त्य असतील.

उत्तर: d)

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो आणि त्यावरून आपण असे सांगू शकतो की दोन्ही निष्कर्ष असत्य आहेत.

म्हणून दोन्ही निष्कर्ष येथे असत्य आहेत. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

3.) विधाने:

१) सर्व पुस्तकं वह्या आहेत.
२) सर्व टेबल वह्या आहेत.

निष्कर्ष:

१) सर्व पुस्तकं टेबल आहेत.
२) काही टेबल पुस्तक आहेत.

a) फक्त निष्कर्ष १ सत्य असेल.
b) फक्त निष्कर्ष २ सत्य असेल.
c) निष्कर्ष १ किंवा २ सत्य
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही असत्य असतील.
e) दोन्ही निष्कर्ष सत्त्य असतील.

उत्तर: d)

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो आणि त्यावरून आपण असे सांगू शकतो की निष्कर्ष १ तर दोन्ही आकृती मधे असत्य ठरतोय.
परंतु निष्कर्ष २ फक्त आकृती १ मधे सत्य ठरत आहे. म्हणून दिलेला निष्कर्ष सत्य होण्यासाठी तो दोन्ही आकृती मधे सत्य असणे महत्वाचे असते.
त्यामुळे इथे दोन्ही निष्कर्ष असत्य ठरतात.

म्हणून दोन्ही निष्कर्ष येथे असत्य आहेत. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

4.) विधाने:

१) सर्व पेन्सिल रबर आहेत.
२) सर्व पेन रबर आहेत.

निष्कर्ष:

१) काही पेन्सिल पेन आहेत.
२) काही रबर पेन्सिल आहेत.

a) फक्त निष्कर्ष १ सत्य असेल.
b) फक्त निष्कर्ष २ सत्य असेल.
c) निष्कर्ष १ किंवा २ सत्य
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही असत्य असतील.
e) दोन्ही निष्कर्ष सत्त्य असतील.

उत्तर: b)

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो आणि त्यावरून आपण असे सांगू शकतो की निष्कर्ष १ फक्त आकृती १ मधे सत्य ठरतोय, म्हणून तो सत्य नसेल. कारण जर दिलेला निष्कर्ष सगळ्या संभाव्य आकृती मधे सत्य ठरत असेल तरच तो सत्य असतो.
परंतु निष्कर्ष २ दोन्ही आकृती मधे सत्य ठरत आहे.
त्यामुळे इथे निष्कर्ष २ सत्य असेल.

म्हणून निष्कर्ष २ येथे सत्य आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

5.) विधाने:

१) सर्व कुत्रे मांजर आहेत.
२) काही मांजर ससे आहेत.

निष्कर्ष:

१) काही ससे कुत्रे आहेत.
२) कोणताही ससा कुत्रा नाही.

a) फक्त निष्कर्ष १ सत्य असेल.
b) फक्त निष्कर्ष २ सत्य असेल.
c) निष्कर्ष १ किंवा २ सत्य
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही असत्य असतील.
e) दोन्ही निष्कर्ष सत्त्य असतील.

उत्तर: c)

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो आणि त्यावरून आपण असे सांगू शकतो की निष्कर्ष १ फक्त आकृती २ मधे सत्य ठरतोय तर निष्कर्ष २ आकृती १ मधे सत्य ठरत आहे. म्हणजे इथे विसंगत निष्कर्ष दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही निष्कर्ष पैकी एक सत्य असणारच.

म्हणून निष्कर्ष १ किंवा २ सत्य असेल. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

6.) विधाने:

१) सर्व पक्षी प्राणी आहेत.
२) काही प्राणी मानव आहेत.

निष्कर्ष:

१) काही पक्षी मानव आहेत.
२) काही मानव प्राणी आहेत.

a) फक्त निष्कर्ष १ सत्य असेल.
b) फक्त निष्कर्ष २ सत्य असेल.
c) निष्कर्ष १ किंवा २ सत्य
d) निष्कर्ष १ आणि २ दोन्ही असत्य असतील.
e) दोन्ही निष्कर्ष सत्त्य असतील.

उत्तर: b)

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे दोन तर्क आकृती काढू शकतो आणि त्यावरून आपण असे सांगू शकतो की निष्कर्ष १ फक्त आकृती २ मधे सत्य ठरतोय तर निष्कर्ष २ दोन्ही आकृती मधे सत्य ठरत आहे. म्हणून निष्कर्ष २ सत्य असेल.

म्हणून निष्कर्ष २ सत्य असेल. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

Read:

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023