Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these रांगेतील स्थान (Sitting Arrangement) problems to ace Reasoning part

अपडेट 22 Nov 2023
शेअर करा:WhatsApp
रांगेतील स्थान (Sitting Arrangement)

This is the eleven no. topic article on Sitting Arrangement Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the रांगेतील स्थान (Sitting Arrangement) topic.

या घटका मधे आपण दिलेल्या शाब्दिक उदाहरणातून जी माहिती दिली आहे त्याचा विचार करून एक कच्ची आकृती काढून त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. मुख्यत अशा प्रश्नांमध्ये एखाद्या व्यक्तीचे डावीकडून किंवा उजवीकडून किंवा समोरून किंवा मागून असे स्थान विचारले जाते. तर काही वेळेस त्या रांगेत एकूण किती मुले असतील हे काढायला सांगितले जाते. तसेच काही वेळेस एकूण संख्या दिली जाते व त्यावरून आपणास योग्य ती मांडणी करावी लागते.

त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

शाब्दिक उदाहरणे:

1.) मुलींच्या रांगेत रीमाच्या उजवीकडे 8 मुली आणि डावीकडे 10 मुली आहेत. तर डावीकडून 6 व्या मुलीचा उजवीकडून काय क्रमांक येईल?

a) 13

b) 14

c) 12

d) 16

उत्तर: b) 14

स्पष्टीकरण:

आपणास दिले आहे की, रिमाच्या उजवीकडे 8 मुली आहेत महणजेच रीमा उजवीकडून 9व्यां क्रमांक वर आहे.

आणि रीमच्या डावीकडे 10 मुली आहेत. म्हणजेच रीमा डावीकडून 11व्यां क्रमांक वर आहे.

म्हणजेच रांगेत एकूण 19 मुली आहेत असे सिध्द होते.

म्हणून खालील आकृती वरून आपण असे सांगू शकतो की डावीकडून 6व्यां क्रमांक वर असणारी मुलगी उजवीकडून 14 व्यां क्रमांक वर नक्कीच असेल.

रांगेतील स्थान (Sitting Arrangement)

2.) 30 मुलींच्या रांगेमध्ये गीता ही सीताच्या पुढे 5 व्या क्रमांक वर आहे. जर सीता चा मागून 15 वां क्रमांक येतोय तर समोरून गीता कितव्या क्रमांक वर असेल?

a)13

b)15

c)12

d)11

उत्तर: c) 12

स्पष्टीकरण:

इथे दिले आहे की, रांगेत एकूण 30 मुली आहेत.

गीता ही सिताच्य समोर 5 क्रमांक वर आहे आणि सीता मागून 15 वा क्रमांक वर आहे.

म्हणजेच गीता आणि सीता यांच्यामधे 3 मुली असतील.

म्हणून खालील आकृती वरून आपण असे सांगू शकतो की गीता ही समोरून 12 व्या क्रमांक वर आहे.

3.) एका मुलांच्या रांगेमध्ये राजेश डावीकडून 5 व्या आणि उजवीकडून 6 व्या क्रमांक वर आहे. जर रांगेत एकूण 13 मुळे बसवायची असतील तर अजून किती मुले बसवता येतील?

a) 2

b) 5

c) 3

d) 4

उत्तर: c) 3

स्पष्टीकरण:

इथे असे दिले आहे की, राजेश डावीकडून 5 व्या आणि उजवीकडून 6 व्या क्रमांक वर आहे.

याचा अर्थ राजेश समोर 4 मुले आणि त्याच्या मागे 5 मुले आहेत आकृतीत दाखविल्याप्रमाणे.

म्हणजे रांगेत एकूण (4+5+राजेश) = 10 मुले आहेत.

जर आपणास 13 मुले बसवायची असतील तर अजून 3 मुले बसवता येतील.

4.) जर 225 मुलांना रांगेत असे उभे करायचे आहे की रांगांची संख्या आणि एका रांगेतील मुले यांची संख्या सारखी असायला हवी. तर अशा किती रांगा होतील.

a) 13

b) 12

c) 14

d) 15

उत्तर: d) 15

स्पष्टीकरण:

इथे एकूण 225 मुले आहेत आणि आपणास माहिती आहे की 225 हा 15 चा वर्ग आहे.

त्यावरून आणि खालील आकृती वरून असे सांगू शकतो की जर एका रांगेत 15 मुले अशा 15 रांगा केल्या तर बरोबर 225 मुले बसतील.

5.) विद्यार्थ्यांच्या एका रांगेत गणेश समोरून 10 वा आहे आणि महेश मागून 12 वा आहे. तसेच गणेश हा महेशच्या समोर उभा असून त्या दोघांमध्ये 4 मुले उभी आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुले उभी आहेत?

a) 24

b) 25

c) 26

d) 27

उत्तर: c) 26

स्पष्टीकरण:

इथे दिले आहे की, गणेश समोरून 10 वा आहे याचा अर्थ त्याच्यासमोर अजून 9 मुले उभी आहेत.

आणि महेश मागून 12 वा आहे याचा अर्थ महेशच्या मागे अजून 11 मुले उभी आहेत.

तसेच महेश आणि गणेश यांच्यामधे 4 मुले उभी आहेत.

म्हणून आकृती वरून आपण एकूण मुले खालील प्रमाणे काढू शकतो.

एकूण मुले = (9 + गणेश + 4 + महेश + 11) = 26 मुले

In case you missed: Last Article on संभाव्यता (Probability)

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023