Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Comparison” problems to ace Reasoning part | या “तुलना” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

अपडेट 20 Sept 2023
शेअर करा:WhatsApp
Solve these “Comparison” problems to ace Reasoning part | या “तुलना” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Comparison” problems to ace Reasoning part | या “तुलनासमस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 33 no. topic article on “Comparison” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Comparison[ तुलना] Topic.

या टॉपिक मधे आपणास विविध घटक किंवा व्यक्ती यांचे गुण, उंची, वय, वजन आवडणाऱ्या गोष्टी याविषयी माहिती दिली जाते जी तुलनात्मक असते. दिलेल्या विश्लेषणात्मक माहिती वरून आपणास एक निष्कर्ष किंवा विशिष्ठ मांडणी करावी लागते आणि त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्यासाठी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचणे व त्यावरून निर्णय घेणे गरजेचे असते. म्हणून वाचन कौशल्य, आकलन क्षमता सुद्धा चांगली असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त प्रश्न सराव केल्यास नक्कीच आपण असे प्रश्न कमी वेळेत सोडवून उत्तम गुण मिळवू शकतो. त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

प्रश्न १) सीमा हेमा पेक्षा वयाने मोठी आहे. सचिन वयाने हेमा पेक्षा मोठा; परंतु सिमापेक्षा लहान आहे. शाम हा राम आणि हेमापेक्षा लहान आहे. हेमा राम पेक्षा मोठी आहे.

१) सचिन आणि राम यांच्या मधे कोणाचे वय येते?
a) हेमा
b) शाम
c) सीमा
d) यापैकी नाही

उत्तर: a) हेमा

२) हेमा आणि शाम यांच्या मधे कोणाचे वय आहे?
a) सचिन
b) राम
c) सीमा
d) यापैकी नाही

उत्तर: b) राम

३) वरील पाचही जनाच्या वयाच्या क्रमा नुसार मध्यभागी कोणाचे वय येते?
a) हेमा
b) सचिन
c) राम
d) सीमा

उत्तर: a) हेमा

४) खालील पैकी वयाने सर्वात मोठे कोण आहे?
a) सीमा
b) हेमा
c) शाम
d) सचिन

उत्तर: a) सिमा

५) खालील पैकी वयाने सर्वात लहान कोण आहे?
a) हेमा
b) राम
c) सीमा
d) शाम

उत्तर: d) शाम

स्पष्टीकरण:

प्रश्न मधे दिलेल्या तुलनात्मक माहिती वरून आपण खालील प्रमाणे मांडणी करू शकतो.
समजा,
सीमा – S
हेमा – H
सचिन – C
शाम – K
राम – R
यानुसार
S > C > H > R > K

प्रश्न २.) एका कुटुंबात संतोष वैभव पेक्षा लहान आहे. राधा मिरा पेक्षा मोठी आहे. संतोष मिरा पेक्षा मोठा आहे. राधा संतोष पेक्षा लहान आहे. तर सगळ्यात मोठा किंवा मोठी कोण आहे?
a) राधा
b) गणेश
c) मिरा
d) संतोष
उत्तर: b) गणेश

स्पष्टीकरण:

दिलेल्या तुलनात्मक माहिती वरून आपण खालील प्रमाणे योग्य क्रम लावू शकतो आणि त्यावरून उत्तरे देऊ शकतो.
गणेश > संतोष > राधा > मिरा

प्रश्न ३.) श्री देशमुख यांची उंची श्री पाटील पेक्षा जास्त आहे.

श्री सावंत यांची उंची श्री देशमुख यांच्या पेक्षा कमी आहे.
श्री शिंदे यांची उंची श्री सावंत यांच्या पेक्षा कमी आहे.
वरील विधान वरून खालील पैकी कोणता निष्कर्ष योग्य ठरतो.
१) श्री शिंदेची उंची श्री पाटील पेक्षा कमी आहे.
२) श्री देशमुख यांची उंची इतर तिघांपेक्षा जास्त आहे.
३) श्री पाटील व श्री सावंत यांची उंची समान आहे.

a) फक्त २ योग्य
b) फक्त ३ योग्य
c) १ आणि २ योग्य
d) २ आणि ३ योग्य
उत्तर: a) फक्त २ योग्य

स्पष्टीकरण:

प्रश्नात दिलेल्या तुलनात्मक माहिती वरून आपण खालील प्रमाणे उंचीचा योग्य क्रम लावू शकतो आणि त्यावरून योग्य उत्तर काढू शकतो.
देशमुख > सावंत > शिंदे
आणि
देशमुख > पाटील

यावरून असे दिसून येते की, फक्त देशमुख यांची उंची इतर तींघापेक्षा जास्त आहे म्हणून फक्त निष्कर्ष २ योग्य ठरेल.

प्रश्न ४.)

I) पल्लवी पूजा पेक्षा मोठी आहे.
II) सुप्रिया पल्लवी पेक्षा मोठी आहे, परंतु सपना पेक्षा लहान आहे.
III) सपना पूजा पेक्षा मोठी आहे.
IV) पूजा सुप्रिया पेक्षा लहान आहे.
V) गायत्री सगळ्यात मोठी आहे.

१) सर्वात लहान कोण आहे?
a) सपना
b) पल्लवी
c) सुप्रिया
d) पूजा

उत्तर: d) पूजा

२) वयानुसार मध्यभागी कोण येते?
a) सपना
b) पल्लवी
c) सुप्रिया
d) पुजा

उत्तर: c) सुप्रिया

३) प्रश्ना मधे दिलेल्या विधान मधून कोणते विधान किंवा विधाने उत्तरे शोधताना गरजेची ठरत नाहीत.
a) I किंवा II
b) फक्त IV
c) I किंवा IV
d) III आणि IV दोन्ही

उत्तर: d) III आणि IV दोन्ही

स्पष्टीकरण:

प्रश्नात दिलेल्या विधान वरून आपण खालील प्रमाणे तुलना करू शकतो आणि मांडणी करू शकतो आणि त्यावरून प्रश्नाची योग्य उत्तर देऊ शकतो.

गायत्री > सपना > सुप्रिया > पल्लवी > पूजा

More Reasoning Parts:-

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023