Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Circular Seating Arrangement” problems to ace Reasoning part | या “वर्तुळाकार बैठक व्यवस्था” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp

This is the 27 no. topic article on “Circular Seating Arrangement” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Circular Seating Arrangement (वर्तुळाकार बैठक व्यवस्था)” topic.

अशा प्रकारच्या कुट प्रश्न मधे आपणास ६ किंवा त्या पेक्षा जास्त व्यक्तींची बैठक व्यवस्था दिली जाते जी बंदिस्त वर्तुळाकार मधे असते. असे प्रश्न सोडवत असताना आपणास एक वर्तुळ काढून त्याचे व्यक्ती दिले तितके समान भाग करून योग्य ती व्यवस्था मांडावी लागते प्रश्ना मधे दिलेल्या सूचनेवरून. स्टेप बाय स्टेप आपण जर ही बैठक व्यवस्था मांडणी केली आणि शेवटी एकवेळ त्याची पडताळणी करून मग आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

अशी उदाहरणे थोडी किचकट असतात परंतु एकदा व्यवस्था पूर्ण केली की सहज आपण विचारलेली प्रश्न सोडवू शकतो.

जास्तीत जास्त सराव करून च अशा प्रश्न मधे अचूकता आणली जाऊ शकते.

त्यासाठी योग्य निरीक्षण आणि वाचन सुद्धा महत्वाचे ठरेल. कोण कोणाच्या समोर बसले आहे, कोन कुणाच्या बाजूला बसून आहे, डावी आणि उजवी बाजू कोणती, याप्रमाणे योग्य ते नियोजन करून आपण असे प्रश्न जलद सुद्धा सोडवू शकतो.

खाली दिलेल्या काही उदाहरणांचा सराव करून नक्कीच आपण वर्तुळाकार बैठक व्यवस्था यात अचूकता आणू शकतो.

कधी कधी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशांची सुद्धा तोंड ओळख असणे गरजेचे असते. किती व्यक्ती दिलेली आहेत हे बघून आपण पुढील प्रक्रिया सुरू करू शकतो.

उदाहरणे:

1.) 6 मित्र वर्तुळाकार मैदानात एकमेकांकडे तोंड करून बसून खेळ खेळत आहेत. त्या सहा मित्रांमध्ये P, Q, R, S, T आणि U हे आहेत. T हा असा बसलाय की तो S च्या डाव्या बाजूला आहे. P आणि Q यांच्या मधे R बसतोय. आणि शेवटी U हा P आणि T यांच्या मधे बसला आहे. तर दिलेल्या सूचनांनुसार हे सहा मित्र वर्तुळाकार मैदानात बसले असतील तर Q च डाव्या बाजूला कोण बसले असेल?

a) R
b) U
c) T
d) S

उत्तर: d) S

स्पष्टीकरण:

दिलेल्या उदाहरणातील सर्व सूचनेवरून, आपण सहा मित्रांची वर्तुळाकार मैदानात एकमेकांकडे तोंड करून बसल्याची व्यवस्था खाली दिलेल्या आकृती मधे केली आहे.

त्यावरून आपणास असे दिसून येते की, Q याच्या डाव्या बाजूला S बसलेला आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

2.) सहा मित्र वर्तुळाकार बैठक मधे एकमेकांकडे तोंड करून बसून कानात कुजबूज करण्याचा खेळ खेळत आहेत. K, L, M, N, O आणि P असे सहा मित्र आहेत आणि ते खाली दिलेल्या सूचनेनुसार त्याच क्रमाने बसलेले आहेत. K हा व्यक्ती P च समोर आणि M च डावीकडे बसला आहे. O हा व्यक्ती N किंवा L यांच्या शेजारी नाही. L हा व्यक्ती K याच्या शेजारी सुद्धा नाही. जर L हा व्यक्ती स्वतःच्या डावीकडे असणाऱ्या व्यक्तीच्या कानात सर्व प्रथम कुजबूज करत असेल तर पहिल्या फेरीच्या शेवटी कोणास कुणास कानात कुजबूज करण्याची संधी मिळणार नाही तो व्यक्ती कोणता?

a) N किंवा P
b) फक्त N
c) फक्त O
d) फक्त P

उत्तर: b) फक्त N

स्पष्टीकरण:

उदाहरणात दिलेल्या सूचना नुसार वर्तुळाकार बैठक व्यवस्था खाली दिलेल्या आकृती सारखी मांडणी केल्यास आपणास असे दिसून येते की D हा व्यक्ती आहे जो फेरीच्या शेवटी असेल ज्याला कानात कुजबूज करण्याची संधी मिळणार नाही.

3.) सहा मित्र हे वर्तुळाकार बैठक मधे एकेमकांकडे तोंड करून बसले आहेत. हे सहा मित्र A, B, C, D, E आणि F आहेत. यात A हा B याच्या समोर बसून आहे, तर B हा E याच्या उजव्या बाजूस पहिला आणि C याच्या डाव्या बाजूस पहिला बसलेला आहे. A हा F याच्या डाव्या बाजूस पहिला आणि D याच्या उजव्या बाजूस पहिला आहे तर A व C यांच्या मधे कोण बसून आहे, आणि D याच्या समोर कोन बसून आहे अनुक्रमे सांगा.

a) A, C
b) D, F
c) D, E
d) E, D

उत्तर: c) D, E

स्पष्टीकरण:

उदाहरणात दिलेल्या सूचना वरून आपण वर्तुळाकार बैठक व्यवस्था मांडणी केली खाली दिलेल्या आकृती सारखी तर आपणास असे दिसून येते की, A आणि C यांच्या मधे द बसला आहे.
तर D याच्या समोर E बसला आहे.

4.) खाली दिलेल्या सूचनांचे पालन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

A, B, C, D, E, F, आणि G हे एका वर्तुळाकार टेबल भोवती जेवणासाठी खालील प्रमाणे बसले आहेत.

• D हा C किंवा E यांच्या शेजारी बसलेला नाही.

• A हा B आणि C यांच्या शेजारी बसलेला आहे.

• G हा D याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसून आहे आणि E व F यांच्या शेजारी बसलेला आहे.

तर C चे योग्य स्थान कोणते असेल?

a) B याच्या डावीकडे दुसरे
b) E याच्या त्वरित डावीकडे
c) A याच्या त्वरित उजवीकडे
d) b आणि c

उत्तर: d) b आणि c

स्पष्टीकरण:

उदाहरणात दिलेल्या सूचना वरून आपण खाली दिलेली वर्तुळाकार बैठक व्यवस्था मांडणी करू शकतो.

त्यावरून असे दिसून येते की, R हा E याच्या त्वरित डावीकडे आणि A याच्या त्वरित उजवीकडे बसलेला आहे.

5.) A, B, C, D, E, F,G, आणि H हे आठ मित्र वर्तुळाकार बैठक व्यवस्था मधे समोरा समोर तोंड करून खाली दिलेल्या सूचना नुसार बसले आहेत.

• A हा E याच्या उजवीकडे दुसरा आहे , तसेच तो C आणि G यांचा त्वरित शेजारी आहे.

• D हा A च शेजारी बसलेला नाही.

• G हा F च शेजारी आहे.

• B हा D आणि H यांच्या मधे बसलेला नाही, H हा F आणि द यांच्या मधे नाही.

तर खाली दिलेल्या कोणत्या दोन व्यक्ती ह्या एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाहीत.

a) FG
b) CA
c) DH
d) CG

उत्तर: d) CG

स्पष्टीकरण:

उदाहरणात दिलेल्या सूचना वरून आपण खाली आकृती मधे दिल्या प्रमाणे मांडणी करू शकतो.

त्यावरून असे दिसून येते की,

F आणि G शेजारी आहेत, C आणि A शेजारी आहेत, D आणि H हे सुद्धा शेजारी आहेत.

परंतु C आणि G हे शेजारी नाहीत. म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

Read:

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023