Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Calendar” problems to ace Reasoning part | या “दिनदर्शिका” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

शेअर करा:WhatsApp
Solve these “Calendar” problems to ace Reasoning part | या “दिनदर्शिका” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Calendar” problems to ace Reasoning part | या “दिनदर्शिका” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 26 no. topic article on “Calendar” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Calendar (दिनदर्शिका)” topic.

दिनदर्शिका वरील प्रश्न सोडवत असताना आपणास बरेच मुद्दे विचारात घ्यावे लागतात. त्यावरून आपण ते प्रश्न अचूक रित्या सोडवू शकतो. त्यासाठी आपण खाली दिलेली काही मुद्दे समजून घेऊ.

•साधे वर्ष म्हणजे 365 दिवस, म्हणजेच 52 आठवडे आणि 1 दिवस.

• लीप वर्ष म्हणजे 366 दिवस, म्हणजेच 52 आठवडे 2 दिवस.

• ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाना 4 ने भाग जातो ते लीप वर्ष असतात. उदा. 2016, 2020, 2024 हे लीप वर्ष आहेत.

• जर वर्ष शतक मधे दिले असेल तर त्याला 400 ने भाग जायला हवा तरच ते लीप वर्ष असेल अन्यथा नाही.

उदा. 2000, 1600, 1200, हे लीप वर्ष आहेत.

1300 हे लीप वर्ष नाही.

खाली दिलेली महिने आणि त्यातील दिवस लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1) जानेवारी: 31 दिवस
(४ आठवडे + 3 दिवस)

२) फेब्रुवारी: २८/२९ दिवस
(४ आठवडे + ०/१ दिवस)

३) मार्च: ३१ दिवस
(४ आठवडे + ३ दिवस)

४) एप्रिल: ३० दिवस
(४ आठवडे + २ दिवस)

५) मे: ३१ दिवस
(४ आठवडे + ३ दिवस)

६) जुन: ३० दिवस
(४ आठवडे + २ दिवस)

७) जुलै: ३१ दिवस
(४ आठवडे + ३ दिवस)

८) ऑगस्ट: ३१ दिवस
(४ आठवडे + ३ दिवस)

९) सप्टेंबर: ३० दिवस
(४ आठवडे + २ दिवस)

१०) ऑक्टोबर: ३१ दिवस
(४ आठवडे + ३ दिवस)

११) नोव्हेंबर: ३० दिवस
(४ आठवडे + २ दिवस)

१२) डिसेंबर: ३१ दिवस
(४ आठवडे + ३ दिवस)

• साधे वर्ष (Normal year): ३६५ दिवस
(५२ आठवडे + १ दिवस)
म्हणून, दिलेलं वर्ष साधे वर्ष असेल तर १ जानेवारीला जो वार असतो तोच ३१ डिसेंबर ल असेल.
• तसेच साधे वर्ष मधे १ जानेवारीला जो वार आहे तो ५३ वेळा येतो(बाकी ५२ वेळा).

• लीप वर्ष (Leap Year): ३६६ दिवस
(५२ आठवडे + २ दिवस)
म्हणून, दिलेलं वर्ष लीप वर्ष असेल तर १ जानेवारीला जो वार असतो तोच ३० डिसेंबर ला असेल.
•तसेच लीप वर्ष मधे १ जानेवारी आणि २ जानेवारीला जे वार येतात ते ५३ वेळा येतात (बाकीचे ५२ वेळा).

• लीप वर्षाचे कॅलेंडर हे दर २८ वर्षानी रिपीट होते.
उदा. २०२४ हे लीप वर्ष आहे आणि या वर्षाचे कॅलेंडर (२०२४+२८) म्हणजेच २०५२ या वर्षी रिपीट होईल.

• (लीप वर्ष + १) असे असेल तर ते वर्ष ६ वर्षानी रिपीट होते.
उदा. १९८९=(१९८८+१) इथे १९८८ हे लीप वर्ष आहे.
म्हणून, १९८९ या वर्षाचे कॅलेंडर (१९८९+६)= १९९५ या वर्षी रिपीट होईल.

• (लीप वर्ष+२) असे असेल तर ते वर्ष ११ वर्षानी रिपीट होते.
उदा. १९९०= (१९८८+२) इथे १९८८ हे लीप वर्ष आहे.
म्हणून, १९९० या वर्षाचे कॅलेंडर (१९९०+११)= २००१ या वर्षी रिपीट होईल.

• (लीप वर्ष+३) असे असेल तर ते वर्ष सुद्धा ११ वर्षानी रिपीट होते.
उदा. १९९१= (१९८८+३) इथे १९८८ हे लीप वर्ष आहे.
म्हणून, १९९१ या वर्षाचे कॅलेंडर (१९९१+११)= २००२ या वर्षी रिपीट होईल.

आता आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू व त्यावरून काही गोष्टी समजून घेऊ.

उदाहरणे:

१.) जर एका लीप वर्षाचा पहिला दिवस हा सोमवार असेल तर त्या वर्षाचा शेवटचं दिवस कोणता असेल?
a) सोमवार
b) मंगळवार
c) बुधवार
d) शनिवार
उत्तर: b) मंगळवार

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून,
लीप वर्षाचा पहिला दिवस: सोमवार
आपणास माहिती आहे, लीप वर्ष करीता ,
१ जानेवारी = ३० डिसेंबर
म्हणून, ३० डिसेंबर ला सोमवार च असेल.
त्यामुळे ३१ डिसेंबर ला मंगळवार येईल.

२.) १३ जानेवारी २००८ ला रविवार असेल तर २००८ या वर्षात कोणता वार ५३ वेळा येईल?
a) सोमवार
b) मंगळवार
c) बुधवार
d) b आणि c दोन्ही
उत्तर: d) b आणि c दोन्ही

स्पष्टीकरण:

२००८ वर्ष हे लीप वर्ष आहे.
आणि आपणास माहिती आहे की लीप वर्ष मधे १ जानेवारी आणि २ जानेवारीला जे वार असतात ते ५३ वेळा येतात.
इथे १३ जानेवारी ल रविवार दिला आहे.
म्हणजे १ जानेवारी ल मंगळवार असेल आणि २ जानेवारीला बुधवार असेल.

म्हणून, मंगळवार आणि बुधवार हे दोन वार २००८ मधे ५३ वेळा येतील.

३.) एक लीप वर्ष मधे १ फेब्रुवारी ला रविवार होता तर त्या वर्षी ३० फेब्रुवारी ला कोणता वार असेल?
a) सोमवार
b) मंगळवार
c) बुधवार
d) वरील पैकी नाही
उत्तर: d) वरील पैकी नाही

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून,
३० फेब्रुवारी च वार विचारला आहे, परंतु ३० फेब्रुवारी कधीच येत नाही.
लीप वर्ष असेल तर २९ फेब्रुवारी येतो.
म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

४.) आज सोमवार आहे, परवा १२ तारीख होती तर तीन दिवसांनी तारीख व वार काय असेल?
a) १६, गुरुवार
b) १७, गुरूवार
c) १७, शुक्रवार
d) १८, गुरुवार
उत्तर: b) १७, गुरुवार

स्पष्टीकरण:

परवा १२ तारीख म्हणजे आज १४ तारीख असेल.
म्हणून, आज सोमवार असेल तर परवा शनिवार होता.
आणि तीन दिवसांनी म्हणजे (१४+३)= १७.

म्हणून,

१२: शनिवार
१३: रविवार
१४: सोमवार
१५: मंगळवार
१६: बुधवार
१७: गुरुवार

म्हणून, तीन दिवसांनी १७ तारीख आणि गुरुवार असेल.

५.) महेश हा त्याच्या बहिणी पेक्षा ७३१ दिवसांनी मोठा आहे. जर त्याच्या बहिणीचा जन्म सोमवारी झालं असेल तर महेश च जन्म कोणत्या दिवशी झालं?
a) रविवार
b) शनिवार
c) शुक्रवार
d) गुरुवार
उत्तर: c) शुक्रवार

स्पष्टीकरण:

महेश आणि त्याची बहीण यातील अंतर ७३१ दिवस.
म्हणजे १०४ आठवडे आणि ३ दिवस.
इथे महेश मोठा आहे त्याच्या बहिनिपेक्षा, म्हणून आपणास ३ दिवस मागे जावे लागेल.
बहीण च जन्म सोमवार ला झालं म्हणजे ३ दिवस मागे गेलो तर शुक्रवार येईल.
म्हणून महेश च जन्म शुक्रवार ला झालं असेल.

६.) २००६ या वर्षीची दिनदर्शिका ही पुढे दिलेल्या कोणत्या वर्षी सारखी असेल?
a) २०१५
b) २०१७
c) २००४
d) २०१६
उत्तर: b) २०१७

स्पष्टीकरण:

इथे दिलेले वर्ष २००६ आहे.
आपण २००६ ला (२००४+२) असे लिहू शकतो.
आणि २००४ हे लीप वर्ष आहे.
म्हणून, (LY+ २) असे येईल.
अशावेळी दिलेले वर्ष ११ वर्षानी पुन्हा रिपीट होते.
म्हणून, (२००६+११)= २०१७ या वर्षी ती दिनदर्शिका रिपीट होईल.

७.) ३ फेब्रुवारी २००४ ला सोमवार असेल तर ३ फेब्रुवारी २०११ ला कोणता वार असेल?

a) सोमवार
b) मंगळवार
c) बुधवार
d) गुरुवार
उत्तर: c) बुधवार

स्पष्टीकरण:

२००४ आणि २०११ यामधे ७ वर्ष फरक येतो.
त्यात, २००४ आणि २००८ हे लीप वर्ष येतात.
म्हणून,
७ दिवस + २ LY= ९ दिवस
९/७ म्हणजे बाकी २.
म्हणून, आपणास २ दिवस पुढे जावे लागेल.
सोमवार आणि दोन दिवस पुढे म्हणजे बुधवार हे आपले योग्य उत्तर असेल.

८.) २०२८ ची दिनदर्शिका कोणत्या वर्षी रिपीट होईल?
a) २०५७
b) २०५४
c) २०५६
d) २०३९
उत्तर: c) २०५६

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे, २०२८ हे लीप वर्ष आहे.
आणि लीप वर्ष कधीपण २८ वर्षानी रिपीट होते.
म्हणून,
२०२८+२८= २०५६
म्हणून, २०५६ ला २०२८ ची दिनदर्शिका रिपीट होईल.

Read: Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023