Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Mathematical Operations” to ace Math part : या “गणितीय आकडे मोड” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

शेअर करा:WhatsApp
Solve these “Mathematical Operations” to ace Math part : या “गणितीय आकडे मोड” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Mathematical Operations” to ace Math part : यागणितीय आकडे मोडचे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Mathematical Operations (गणितीय आकडे मोड): या प्रकारच्या टॉपिक मधे आपणास काही समीकरणे दिली जातात आणि त्या समीकरण मधे चिन्हांची अदलाबदल करायला दिली जाते किंवा अंकांची अदलाबदल करायला दिली जाते. ती अदलाबदल करून त्यानंतर जे समीकरण मिळते ते सोडवून त्यावरून आपणास उत्तर काढायचे असते. तसेच कधी कधी चिन्हे, अंक किंवा अक्षरे यांचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे coding दिली जाते आणि त्यात अदलाबदल करून आपल्याला अंतिम उत्तर काढायचे असते. ही उदाहरणे जरी सोपी वाटत असली तर घाई घाई मधे आपण गोंधळ करून सोपे प्रश्न पण चुकवून टाकतो. म्हणून असे सोपे प्रश्न सोडवत असताना आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि हे तोंडी न सोडवता कमी वेळेत कागदावर सोडवून लगेच उत्तर काढू शकतो. IBPS पॅटर्न मधे अशा प्रश्नांवर जास्त भर दिल्या जातो. म्हणून या प्रश्नाचे मार्क्स आपण मिळवायला च हवे. त्यासाठी सराव आणि अचूकता आपल्या हाती असणे गरजेचे आहे. म्हणून जास्त सराव करावा लागेल. आता आपण यावरील उदाहरणे अभ्यासू आणि सराव करू.

उदाहरणे:

१.) जर A म्हणजे +, B म्हणजे × , C म्हणजे ÷ आणि D म्हणजे – असेल तर खालील समीकरण सोडवून कोणते उत्तर मिळेल?

16 C 7 B 49 C 28 A 63 D 21 A 1 = ?

a) 47

b) 49

c) 63

d) 45

उत्तर:  a) 47

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

16 C 7 B 49 C 28 A 63 D 21 A 1 = ?

दिलेल्या माहिती वरून आपण समीकरण खालील प्रमाणे लिहू शकतो.

16 ÷ 7 × 49 ÷ 28 + 63 – 21 + 1

= 4 + 63 – 21 + 1

= 47

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

Solve: Elementary Algebra Questions for 75,000 Saralseva Bharti 2023

 २.) जर A म्हणजे 30, B म्हणजे 42, C म्हणजे 7, D म्हणजे 6 आणि E म्हणजे 25 असेल तर खालील पैकी कोणते समीकरण आपणास 19 हे उत्तर देईल?

a) A – B ÷ C × D + E

b) A × B ÷ C + D × E

c) A ÷ B × C + D + E

d) A + B ÷ C × D – E

उत्तर : a) A – B ÷ C × D + E

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून, आपण पर्याय a) असे लिहू शकतो,

= 30 – 42 ÷ 7 × 6 + 25

= 30 – 36 + 25

= 55 – 36

= 19

म्हणून पर्याय a) आपल्याला 19 हे उत्तर देतो. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

३.) जर 7#6 = 84, 1#4 = 8 आणि 2#3 = 12 असेल तर 8#4 = ?

a) 64

b) 36

c) 12

d) 40

उत्तर: a) 64

स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून,

7#6 = (7×6)×2 =42×2 = 84

1#4 = (1×4)×2 = 4 × 2 = 8

2#3 = (2×3)× 2 = 6 × 2 = 12

त्यानुसार,

8#4 = (8 × 4)× 2 = 32 × 2 = 64

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

 ४.) जर A म्हणजे +, B म्हणजे -, C म्हणजे × आणि D म्हणजे ÷ असेल तर (1 D 1 C 1) A(2 C 2 D 2) A (3 D 3 C 3) B (4 C 4 D 4) ची किंमत काय येईल?

a) 3

b) 2

c) 6

d) 10

उत्तर: b) 2

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

(1 D 1 C 1) A(2 C 2 D 2) A (3 D 3 C 3) B (4 C 4 D 4)

दिलेल्या माहिती वरून आपण वरील समीकरण खालील प्रमाणे लिहू शकतो.

= (1 ÷ 1 × 1)+ (2 × 2 ÷ 2) + (3 ÷ 3 × 3) – (4 × 4 ÷ 4)

= 1 + 2 + 3 – 4

= 6 – 4

= 2

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

 ५.) जर खाली दिलेल्या समीकरण मधे + आणि × या चिन्हांची अदलाबदल केली, तसेच 5 आणि 9 यांची अदलाबदल केली तर खालील पैकी कोणते समीकरण संतुलित असेल?

a) 2 × 9 + 3 × 5 = 21

b) 5 × 9 + 3 × 3 = 0

c) 9 × 5 + 2 × 2 = 25

d) 3 + 9 × 3 + 5 = 32

उत्तर: c) 9 × 5 + 2 × 2 = 25

स्पष्टीकरण:

जर आपण पर्याय c) मधे, प्रशांत दिलेल्या माहिती नुसार बदल केले तर,

9 × 5 + 2 × 2 = 25

= 5 + 9 × 2 + 2

= 5 + 18 + 2

= 25

म्हणून पर्याय c) मधील समीकरण संतुलित होईल.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

 ६.) जर P म्हणजे ÷, Q म्हणजे +, R म्हणजे – आणि S म्हणजे × अस तर खालील समीकरणाची किंमत काय येईल?

10 R 192 P 48 S 48 P 96 Q 1 = ?

a) 12

b) 19

c) 11

d) 9

उत्तर: d) 9

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

10 R 192 P 48 S 48 P 96 Q 1 = ?

दिलेल्या माहिती वरून आपण वरील समीकरण खालील प्रमाणे लिहू शकतो.

10 – 192 ÷ 48 × 48 ÷ 96 + 1 = ?

= 10 – 4 × 0.5 + 1

= 10 – 2 + 1

= 11 – 2

= 9

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

 ७.) जर + म्हणजे -, – म्हणजे ×, × म्हणजे ÷, ÷ म्हणजे + असेल तर खाली दिलेल्या समीकरणाची किंमत काय येईल?

45 × 5 – 3 ÷ 60 + 22 = ?

a) 56

b) 65

c) 76

d) 67

उत्तर: b) 65

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

45 × 5 – 3 ÷ 60 + 22 = ?

दिलेल्या माहिती वरून आपण वरील समीकरण खालील प्रमाणे लिहू शकतो.

45 ÷ 5 × 3 + 60 – 22

= 27 + 60 – 22

= 87 – 22

= 65

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

 ८.) जर आपण खाली दिलेल्या समीकरण मधे + हे चिन्ह – या चीन्हाने बदलले आणि ÷ हे चिन्ह × या चीन्हणे बदलले तर खालील पैकी कोणते समीकरण संतुलित समीकरण असेल?

a) 15 × 3 – 17 + 6 ÷ 2 = 11

b) 2 ÷ 7 + 8 – 21 × 3 = 14

c) 12 – 16 × 2 + 5 ÷ 4 = 1

d) 17 + 7 ÷ 2 – 21 × 3 = 10

उत्तर: d)  17 + 7 ÷ 2 – 21 × 3 = 10

स्पष्टीकरण:

जर आपण पर्याय d) मधे प्रश्न मधे दिल्या नुसार बदल केले तर,

17 + 7 ÷ 2 – 21 × 3 = 10

17 – 7 × 2 + 21 ÷ 3 = 10

17 – 14 + 7 = 10

24 – 14 = 10

10 = 10

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) असेल.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023