Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Interchanging of Signs” to ace Reasoning part : या “चिन्हांची अदलाबदल” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

शेअर करा:WhatsApp
Solve these “Interchanging of Signs” to ace Reasoning part : या “चिन्हांची अदलाबदल” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Interchanging of Signs” to ace Reasoning part : याचिन्हांची अदलाबदलचे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

चिन्हांची अदलाबदल (Interchanging of Signs): या टॉपिक मधे आपणास बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यासारखी एकत्रित उदाहरणे दिली जातात आणि अंतिम उत्तर काढायचे असते. ही उदाहरणे जरी सोपी असतील तरी आपणास त्याचे अचूक उत्तर कधी कधी मिळत नाही कारण आपण त्या नियमाने ती उदाहरणे सोडवत नाही. त्यासाठी गणीतामधील आकडे मोड करताना कोणते नियम आहेत हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कारण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तर शाळेतील मुले सुद्धा करतील परंतु जेव्हा हे सर्व एकत्र दिले जाते तेव्हा मात्र तारांबळ उडू शकते. म्हणून बऱ्याच वेळा अशी साधी वाटणारी परंतु किचकट प्रश्न आपणास विचारली जाऊ शकतात. ही उदाहरणे अती महत्वाची असून प्रतेक स्पर्धा परीक्षेत विचारली जातात.

म्हणून सराव करणे आणि नियमानुसार सराव करणे हेच उत्तम असेल. तसेच हा भाग जास्तीत जास्त गुण कमी वेळेत मिळवून देऊ शकतो.

त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

१.) खाली दिलेले समीकरण योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणते दोन चिन्ह यांची अदलाबदल करावी लागेल?

5 + 3 × 8 – 12 ÷ 4 = 3

a) + आणि –

b) – आणि ÷

c) + आणि ÷

d) + आणि ×

उत्तर: b) – आणि ÷

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

5 + 3 × 8 – 12 ÷ 4 = 3

जर आपण – आणि ÷ या चिन्हांची अदलाबदल केली तर,

5 + 3 × 8 ÷ 12 – 4 = 3

5 + 2 – 4 = 3

7 – 4 = 3

3 = 3

म्हणजे इथे समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

२.) खालील समीकरण योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणते दोन चिन्ह यांची अदलाबदल करावी लागेल?

5 + 6 ÷ 3 – 12 × 2 = 17

a) + आणि ×

b) + आणि ÷

c) ÷ आणि ×

d) – आणि +

उत्तर: c) ÷ आणि ×

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

5 + 6 ÷ 3 – 12 × 2 = 17

जर आपण दिलेल्या समीकरण मधे ÷ आणि × या चिन्हांची अदलाबदल केली तर,

5 + 6 × 3 – 12 ÷ 2 = 7

5 + 18 – 6 = 17

23 – 6 = 17

17 = 17

म्हणजे इथे समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

३.) खालील समीकरण मधे दोन्ही बाजू समान होण्यास कोणते दोन चिन्ह यांची अदलाबदल करावी लागेल?

10 + 10 ÷ 10 – 10 × 10 = 10

a) + आणि ×

b) + आणि ÷

c) ÷ आणि ×

d) – आणि +

उत्तर: a) + आणि ×

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

10 + 10 ÷ 10 – 10 × 10 = 10

जर आपण दिलेल्या समीकरणात + आणि × या चिन्हांची अदलाबदल केली तर,

10 × 10 ÷ 10 – 10 + 10 = 10

10 – 10 + 10 = 10

10 = 10

म्हणजे इथे आपले समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय a) असेल.

४.) खाली दिलेले समीकरण योग्य आहे दाखवण्यासाठी कोणती दोन चिन्हे यांची अदलाबदल करावी लागेल?

12 ÷ 2 – 6 × 3 + 8 = 16

a) × आणि –

b) + आणि ×

c) + आणि –

d) ÷ आणि +

उत्तर: c) + आणि –

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

12 ÷ 2 – 6 × 3 + 8 = 16

जर आपण दिलेल्या समीकरण मधे + आणि – या चिन्हांची अदलाबदल केली तर,

12 ÷ 2 + 6 × 3 – 8 = 16

6 + 18 – 8 = 16

24 – 8 = 16

16 = 16

म्हणजे आपले समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

५.) खाली दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी कोणती दोन चिन्ह यांची अदलाबदल करावी लागेल?

9 + 5 ÷ 4 × 3 – 6 = 12

a) × आणि –

b) + आणि ×

c) + आणि –

d) ÷ आणि –

उत्तर: d) ÷ आणि –

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

9 + 5 ÷ 4 × 3 – 6 = 12

जर आपण दिलेल्या समीकरण मधे ÷ आणि – या चिन्हांची अदलाबदल केली तर,

9 + 5 – 4 × 3 ÷ 6 = 12

14 – 2 = 12

12 = 12

म्हणजे इथे आपले समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय d) आहे.

 ६.) एका विशिष्ट कोड लँग्वेज मधे, + हे चिन्ह × दाखवते, – हे चिन्ह + दाखवते, × हे चिन्ह ÷ दाखवते आणि ÷ हे चिन्ह – दाखवत असेल तर खालील समीकरण त्या प्रमाणे सोडवून कोणते उत्तर येईल?

8 – 2 + 81 × 27 ÷ 3 = ?

a) 55

b) 11

c) 26

d) 17

उत्तर: b) 11

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण 8 – 2 + 81 × 27 ÷ 3 = ?

दिलेल्या माहिती वरून, आपण खालील प्रमाणे समीकरण लिहू शकतो.

8 + 2 × 81 ÷ 27 – 3

= 8 + 2 × 3 – 3

= 8 + 6 – 3

= 14 – 3

= 11

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय b) असेल.

 ७.) खालील समीकरण मधे कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केली असता ते समीकरण संतुलित होईल?

211 × 14 + 627 ÷ 33 – 17 = 520

a) + आणि –

b) + आणि ÷

c) × आणि +

d) × आणि –

उत्तर: d) × आणि –

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

211 × 14 + 627 ÷ 33 – 17 = 520

जर आपण दिलेल्या समीकरण मधे × आणि – या चिन्हांची अदलाबदल केली तर,

211 – 14 + 627 ÷ 33 × 17 = 520

211 – 14 + 19 × 17 = 520

211 – 14 + 323 = 520

534 – 14 = 520

520 = 520

म्हणजे आपले समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून योग्य उत्तर पर्याय d) असेल.

Also Solve: Mathematical Operations Question and Answer Solution

 ८.) खाली दिलेल्या समीकरण मधे कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागले जेणे करून दिलेले समीकरण संतुलित होईल?

7 – 9 × 3 ÷ 9 + 5 = 5

a) – आणि ×

b) ÷ आणि ×

c) + आणि –

d) + आणि ÷

उत्तर: c) + आणि –

स्पष्टीकरण:

दिलेले समीकरण,

7 – 9 × 3 ÷ 9 + 5 = 5

जर आपण दिलेल्या समीकरण मधे + आणि – या चिन्हांची अदलाबदल केली तर,

7 + 9 × 3 ÷ 9 – 5 = 5

7 + 3 – 5 = 5

10 – 5 = 5

5 = 5

म्हणजे आपले समीकरण संतुलित झाले आहे.

म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

15 Nov 2023
Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

10 Nov 2023
Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

9 Oct 2023
Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

7 Oct 2023