Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maraṭhi Vyakaran

Marathi Vyakaran “नाम (Noun)” | MCQ Related Marathi Grammar “Nam”

अपडेट 9 Dec 2024
शेअर करा:WhatsApp
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Marathi Vyakaran “नाम (Noun)” | MCQ Related Marathi Grammar “Nam”

उदा: गाढव ,रामदास, नागपूर , जपान , गंगा, भरत , माहूर गड , हिमालय , पोपट ,यमुना, गोदावरी ,हिमाचल, पेन्सिल इत्यादी.

३) भाववाचक नाम /धर्मवाचक नाम: प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या नावात धर्माचा, गुणाचा किंवा भवाचा साक्षात्कार होत असेल तर त्याला भव वाचक/धर्मवाचक नाम म्हणतात.

उदा: गुलामगिरी, धैर्य, हास्य, गोडी , आनंद , चांगुलपणा , कीर्ती इत्यादी.


मराठी व्याकरण सीरीज: नाम MCQ

आपणघेऊन आलो आहोत मराठी व्याकरण  सिरीज जी येणाऱ्या महाराष्ट्र शासनातील “MPSC, म्हाडा, तलाठी, महाराष्ट्र पोलीस, वनविभाग” या पदासाठी  तसेच मध्ये होणाऱ्या विविध महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

Updated on: 16th APRIL 2022

१) पुढीलपैकी “समूहवाचक नाम” ओळखा?

(१)राम

(२) श्याम

(३) कळप

(४)हिमालय

उत्तर:(३) कळप

२) पुढीलपैकी “पदार्थवाचक नाम” ओळखा?

(१) हरी

(२) साखर

(३) तूप

(४)पर्याय २ व ३

उत्तर:(४) पर्याय २ व ३

३) आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) सामान्यनाम

(२)विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) भाववाचक नाम

४) तुमचे वडील साक्षात “रावणच” आहे.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) सामान्यनाम

(२) विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) सामान्यनाम

५) नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) अव्ययसाधित नाम

(२) विशेषण साधित नाम

(३) धातुसाधित नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) विशेषण साधित नाम

६) त्याच्या प्रत्येक वाक्यात ‘परंतु”चा वापर होत होता.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) अव्ययसाधित नाम

(२) विशेषण साधित नाम

(३) धातुसाधित नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) अव्ययसाधित नाम

७) राहुलने आईसोबत१६मंगळवारचेव्रत केले.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१) सामान्यनाम

(२) विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) सामान्यनाम

८) “एकता” व“बंधुता”अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१)विशेषनाम

(२)धातुसाधित नाम

(३) अव्ययसाधित नाम

(४) भाववाचक नाम

उत्तर:(४) भाववाचक नाम

९) समान गुणधर्म असणाऱ्या “अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला “———-“ म्हणतात.

(१)अव्ययसाधित नाम

(२)समूहवाचक नाम

(३) पदार्थवाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) समूहवाचक नाम

१०) “मांजरी” झाडावर चढल्या.अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार कोणता आहे?

(१)अव्ययसाधित नाम

(२)पदार्थवाचक नाम

(३) सामान्य नाम

(४) विशेषनाम

उत्तर:(३) सामान्य नाम


Updated on: 11th APRIL 2022

१) मराठीत नामाचे किती प्रकार आहे?

(१)२

(२) ३

(३) ५

(४)९

उत्तर:(२) ३

२) नामाला———– असेही म्हणतात.

(१) विशेष्य

(२) विशेषण

(३) प्रतीनाम

(४)सर्वनाम

उत्तर:(१) विशेष्य

३) सृष्टीतील कोणत्याही वस्तूला जे सर्व सामान्य नाव दिले जाते त्याला ——— म्हणतात.

(१) नाम

(२)सर्वनाम

(३) विशेषण

(४) क्रियापद

उत्तर:(१) नाम

४) “वकिली” हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?

(१)सर्वनाम

(२) सामान्यनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) भाववाचक नाम

५) नामाच्या प्रकारातील ———– या नामाचे अनेकवचन होते.

(१) भाववाचक नाम

(२) सामान्यनाम

(३) सर्वनाम

(४) क्रियापद

उत्तर:(२) सामान्यनाम

६) ज्या वस्तू डोळ्यांनी पाहता येत नाही, कल्पनेने जाणलेल्या गुण,अवस्था व कृती यांना ———- म्हणतात.

(१) सामान्यनाम

(२) भाववाचक नाम

(३) विशेषनाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) भाववाचक नाम

७) “माणुसकी” हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?

(१)सामान्यनाम

(२)विशेषनाम

(३) सर्वनाम

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(४) वरीलपैकी नाही

८) भाववाचक नामांचा गट कोणता ते ओळखा.

(१)वकिली, मनुष्यत्व, लुच्चेगिरी

(२)राम,सागर,रहीम

(३) मी,तो,हा,जो

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) वकिली, मनुष्यत्व, लुच्चेगिरी

९) रामने रोहितला दोन रुपये दिले. या शब्दाचा प्रकार ओळखा.

(१)विशेषनाम

(२)सामान्यनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) सामान्यनाम

१०) पूजा खूपसुंदर आहे.या शब्दाचा प्रकार ओळखा.

(१) विशेषनाम

(२) सामान्यनाम

(३) व्यक्तिवाचक नाम

(४) पर्याय १ व ३

उत्तर:(४) पर्याय १ व ३

११) “समिती”हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?

(१)सामान्य नाम

(२)विशेष नाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) सामान्य नाम

१२) तुमचा मुलगा “कुंभकर्णच” दिसतो. अधोरेखितनाम कोणत्या प्रकारचे आहे?

(१)सामान्य नाम

(२)विशेष नाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) सामान्य नाम

१३) बाबांनी मला “शाबासकी” दिली.अधोरेखितनाम कोणत्या प्रकारचे आहे?

(१)सामान्य नाम

(२)विशेष नाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) भाववाचक नाम

१४) नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?

(१)अविकारी

(२) विकारी

(३) एकवचनी

(४) अनेकवचनी

उत्तर:(२) विकारी

१५) भाववाचक नामाचा पर्याय ओळखा?

(१)कृष्णा,हिमालय,नर्मदा

(२) गांभीर्य,शौर्य,चातुर्य

(३) नदी,पुस्तक,झाड

(४) मुलगा,कुत्रा,साखर

उत्तर:(२) गांभीर्य,शौर्य,चातुर्य


Updated on: 9th APRIL 2022

१) तुमचा मुलगा शेकस्फिअरच आहे.अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?

(१)सामान्यनाम

(२) विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(१) सामान्यनाम

२) आमच्या शेजारची तारा काल मुंबईला गेली.अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?

(१) सामान्यनाम

(२) विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४)सर्वनाम

उत्तर:(२) विशेषनाम

३) मी काल“रामायण” वाचले.अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?

(१) सामान्यनाम

(२)विशेषनाम

(३) भाववाचक नाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२)विशेषनाम

४) सामान्यनाम आणि विशेषनाम यांना एकत्रित पणे ——- म्हणतात.

(१)सर्वनाम

(२) प्रतीनाम

(३) धर्मिवाचक नाम

(४) धर्मवाचक नाम

उत्तर:(३) धर्मिवाचक नाम

५) खालीलपैकी विशेषनामाचा गट ओळखा.

(१) वाघ, सिंह,मुलगा,मुली

(२) राम, राहुल, हिमालय,काजल

(३) कीर्ती,वकिली, चपळाई, गुलामगिरी

(४) वरीलपैकी नाही.

उत्तर:(२) राम, राहुल, हिमालय,काजल

६) “माता” या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा?

(१) माती

(२) मातृत्व

(३) माते

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) मातृत्व

७) पुढीलपैकी कोणते कृतीवाचक भाववाचक नाम आहे?

(१)चोरी, उड्डाण, धाव, हास्य

(२)राम, राहुल, हिमालय,काजल

(३) वाघ, सिंह,मुलगा,मुली

(४)वरीलपैकी नाही.

उत्तर:(१) चोरी, उड्डाण, धाव, हास्य

धन्यवाद…..????


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03
Maraṭhi Vyakaran

Marathi Vyakaran “शब्दयोगी अव्यय (Preposition)” | MCQ Related Marathi Grammar “Shabdayogi Avyay”

12 May 2022
TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03
Maraṭhi Vyakaran

Marathi Vyakaran “क्रियापद (Verb)” | MCQ Related Marathi Grammar “Kriyapad”

30 Apr 2022