Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Exams

MAHA TET 2024 करीता ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अपडेट 10 Sept 2024
शेअर करा:WhatsApp
MAHA TET 2024 करीता ऑनलाईन अर्ज कसा करावा?

How to apply for MAHA TET 2024/ MAHA TET 2024 करीता ऑनलाईन अर्ज कसा करावा

आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये पहिली ते आठवी करिता शिक्षक होण्यासाठी MAHA TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही परीक्षा पहिली ते पाचवी करिता एक पेपर आणि सहावी ते आठवी करिता दुसरा पेपर अशा स्वरूपाची असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच उमेदवार हा पहिली ते आठवी कविता शिक्षक म्हणून पात्र ठरतो. महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये ही परीक्षा आयोजित केली होती त्यानंतर तीन वर्षांनी ही परीक्षा आता 2024 मध्ये होणार आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांना ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. 2013 पासून पहिली ते आठवी करिता शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती. आणि ही परीक्षा महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडून आयोजित करण्यात येत होती. आज पर्यंत ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपाची होत असायची आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा भ्रष्टाचार झाल्याचा दिसून आलं. म्हणून या भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी पहिल्यांदा ही परीक्षा 2024 मध्ये ऑनलाइन होत आहे तसेच ही परीक्षा आयबीपीएस या कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे. जर आपण शिक्षक होण्यासाठी इच्छुक असाल तर आपणासाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली असेल. म्हणून या सुवर्णसंधीचे सोने करायला विसरू नका. या परीक्षेचे फॉर्म जानेवारी महिन्यात चालू होत असून ही परीक्षा फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च महिन्यामध्ये होऊ शकते. या परीक्षेचा अर्ज कसा करावा त्यासाठी आम्ही आपणास इथे योग्य मार्गदर्शन करणार आहोत. तीन ते चार वर्षाच्या सलग कालावधीनंतर माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर्षी या परीक्षेचे आयोजन करण्याचे ठरवले आहे आणि या परीक्षेनंतर लगेच बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी TAIT 2024 घेऊन शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा नियोजन केलं आहे. म्हणून ही परीक्षा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीच होत आहे याचा आपण नक्कीच फायदा करून घ्यायला हवा. या परीक्षेत दरवर्षी लाखो विद्यार्थी ऑनलाईन अप्लिकेशन करत असतात आणि त्यातून तीन ते चार टक्केच विद्यार्थी हे उत्तीर्ण होत असतात. यावरून आपण असे समजू शकतो की ही परीक्षा किती उच्च पातळीची आहे तसेच यावेळेस ही परीक्षा ऑनलाईन आणि आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार असल्याने याची पातळी अजून उंचावली जाऊ शकते. जर आपण नवीन असाल आणि आपले DEd किंवा BEd झालेले असेल तर नक्कीच आपण हा फॉर्म भरू शकता. सदर परीक्षेविषयीची अर्ज भरण्यापासून ची तर परीक्षा होईपर्यंतच्या सर्व अंदाजित तारखा आम्ही खाली दिलेल्या आहेत.

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024.
  • प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची सुरुवात: 28 ऑक्टोबर 2024.
  • परीक्षाची तारीख: 10 नोव्हेंबर 2024.

अशाप्रकारे ही परीक्षा अगदी फास्ट मध्ये घेतल्या जाणार असून निवडणुका होण्याआधी या परीक्षेचा निकाल सुद्धा लागलेला असेल.

म्हणून ऑनलाईन अर्ज भरण्यापासून तर प्रवेश पत्र आणि परीक्षा नियोजन आणि त्यानंतर निकाल या सर्व गोष्टी अतिशय जलद गतीने होणार आहेत. तत्पूर्वी आपण यासाठी संपूर्णरित्या तयार असणे याची गरज आहे त्यासाठी आम्ही खाली आपणास परीक्षा नोंदणी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले आहे ते आपण पाहू शकता.

????डीएड उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MAHA TET Paper 1 उत्तीर्ण करणे अनिवार्य असते आणि असे विद्यार्थी हे पहिली ते पाचवी करिता पात्र ठरतात.

???? बीएड उत्तीर्ण असणारे विद्यार्थी यांना MAHA TET Paper 2 उत्तीर्ण करणे अनिवार्य असते आणि असे विद्यार्थी सहावी ते आठवी करिता पात्र ठरतात. तसेच डीएड सोबत पदवी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा MAHA TET Paper 2 उत्तीर्ण करू शकतात.

या संबंधीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया याच महिन्यात लवकरात लवकर सुरू होणार असून त्यासाठी तुम्ही mahatet.in या संकेतस्थळावर जाऊन भेट देऊ शकता.

MAHA TET Paper 1/2 ही एक पात्रता परीक्षा असल्याने पहिली ते आठवी करिता शिक्षक होण्यासाठी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करताना लागणारी आवश्यक माहिती

दरवर्षी महा टीईटी MAHA TET 2024 ही परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे म्हणजेच MSCE पुणे यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यायची. परंतु यावर्षी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार असून या परीक्षेचा अभ्यासक्रम थोड्याफार प्रमाणात बदललेला असू शकतो.

  • या परीक्षेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होणार असून त्यासाठी आयबीपीएस कंपनीमार्फत आपल्याला लिंक उपलब्ध करून दिला जाईल.
  • त्या लिंक वर गेल्यानंतर सुरुवातीला आपणास आपले प्रोफाईल बनवायचे आहे त्यात आपण आपले नाव जन्मतारीख आणि शैक्षणिक माहिती भरून आपला प्रोफाइल क्रिएट करायचा आहे.
  • प्रोफाइल क्रिएट केल्यानंतर आपण आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे ज्याचा वापर करून आपण पुन्हा अर्ज करण्याची प्रक्रिया करू शकतो.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून आपल्याला पुन्हा लॉगिन करून ऑनलाईन अर्ज संपूर्णतः योग्य पद्धतीने आणि अचूक रित्या भरून सबमिट करायचा आहे.
  • त्यात फॉर्म भरताना आवश्यक असणारी शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती खालील प्रमाणे आहे.
  • तुमचे नाव दहावी बोर्ड प्रमाणे
  • जन्मतारीख दहावी बोर्ड प्रमाणे
  • तुमचा प्रवर्ग पुरावा Caste Certificate
  • अधिवास प्रमाणपत्र Domicile Certificate
  • चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
  • तुमचा घरच पत्ता Address
  • महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा
  • आधार कार्ड Adhaar Card
  • मतदान कार्ड Voter ID
  • दहावी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • बारावी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • डीएड गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • बीएड गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र आणि गुणक पत्र
  • बीएड किंवा डीएडला तुम्ही घेतलेले विषय
  • परीक्षा द्यावयाचे मिडीयम
  • वरील कागदपत्रे यांची PDF
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • हस्ताक्षर

सर्वात महत्वाची भरावयाची माहिती

इत्यादी वरील बाबी अचूकरीत्या भरल्यानंतर आपणाला पुन्हा एकदा आपला फॉर्म चेक करायचा आहे आणि आपण निवडलेले बीएड किंवा डीएडला असलेल्या मेथड चे विषय पुन्हा एकदा चेक करायचे आहे कारण हे विषय खूप महत्त्वाचे ठरतात.

त्यानंतर आपण निवडलेली भाषा हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही ज्या विषयातून आणि भाषेतूनही परीक्षा देणार त्याच विषयासाठी किंवा भाषेसाठी तुमची शिक्षक म्हणून नियुक्ती केली जात असते. त्यासाठी काटेकोरपणे फॉर्म भरताना काळजी घ्यावी ही त्या उमेदवाराची जबाबदारी असेल.

प्रवर्गानुसार प्रत्येक प्रवर्गाचा उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया हा ठरलेला असतो. त्यानुसारच मार्क्स मिळवून उत्तीर्ण होणे म्हणजेच ही परीक्षा पात्र करणे अनिवार्य केले आहे . या परीक्षेचा कोणताही कटऑफ वगैरे नसतो.

तसेच ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आणि आवश्यक ती भरल्यानंतर आपल्याला आपला एप्लीकेशन फॉर्म हा डाऊनलोड करून योग्य ठिकाणी सेव करायचा असतो किंवा त्याची प्रिंट काढून घेऊ शकतो. परीक्षा होण्यापासून ते शिक्षक बनेपर्यंत केव्हाही हा आपलिकेशन फॉर्म आपल्याला कमी पडू शकतो.

तसेच ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म, प्रवेश पत्र आणि निकालाची प्रत या तीनही गोष्टी शिक्षक होईपर्यंत नीट सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. कारण वेळोवेळी यांची गरज आपल्याला भासणार आहे याची प्रत्येक उमेदवाराने दक्षता घ्यावी.

MAHA TET 2024 ऑनलाईन होण्याचे फायदे:

  • MAHA TET 2024 ही परीक्षा ऑनलाईन होत असल्याकारणाने संपूर्ण प्रोसेस लवकरात लवकर होऊन एकाच वेळी किंवा शिफ्ट मध्ये परीक्षा नियोजन होऊन त्याचा निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर होऊ शकतो.
  • तसेच ही परीक्षा ऑनलाईन होत असल्याकारणाने आणि आयबीपीएस मार्फत होणार असल्याने यात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गोंधळ किंवा फ्रॉड दिसून येणार नाही.
  • एकंदरीत महा टीईटी 2024 ही परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि जलद गतीने होणार याची चिन्हे दिसून येत आहेत.
  • ही परीक्षा घेऊन निकाल जाहीर केल्यानंतर लगेच शिक्षक भरती करिता आवश्यक असणारी परीक्षा म्हणजेच बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी TAIT (Teaching Aptitude and Intelligence Test) 2024 चे आयोजन सुद्धा लवकरात लवकर घेतली जाईल.

अशाप्रकारे महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ही ऑनलाइन आणि आयबीपीएस या आयटी कंपनीमार्फत आयोजित करण्याचे ठरविले आहे जे उमेदवारांसाठी हितकारक ठरेल.

अर्ज करतानाचे महत्वाचे मुद्दे:

  • जर तुम्ही डीएड आणि पदवी पूर्ण केलेली असेल किंवा डीएड आणि पदवी पूर्ण केलेली असते तर आपणास MAHA TET Paper 2 देणे अनिवार्य असेल आणि आपण वर्ग 6-8 करीता विषय शिक्षक म्हणून नियुक्त व्हाल.

जर तुमचा पदवीला आणि BEd ल Maths आणि Science हे विषय असतील तर तुम्हाला MAHA TET Paper 2 गणित आणि विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

  • जर तुमचे पदवीला आणि BEd ल भाषा विषय असतील तर ते विषय घेऊन तुम्ही महा TET Paper 2 उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
  • जर तुमचे पदवीला आणि BEd ल सामाजिक शास्त्रे विषय असतील तर तुम्हाला MAHA TET Paper 2 त्याच विषयातून उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

MAHA TET 2024 परिक्षा पॅटर्न:

  • वेळ – 150 मिनिटे
  • प्रश्न – 150
  • गुण – 150

अशाप्रकारे वेळोवेळी आवश्यक असणारी आणि प्रसिद्ध होणारी सर्व ऑथेंटिक माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि आमच्या टेलिग्राम चैनल जॉईन करा.

तसेच MAHA TET 2024 परीक्षा अर्ज करण्यासाठीची आवश्यक पात्रता, संपूर्ण अभ्यासक्रम, उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया, ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी अशा अनेक अति महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही आपणास मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी आमचे पेज नक्कीच लाईक करा आणि फॉलो करा.

Here’s the direct link to apply for Maha TET 2024: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Process after Locking Preferences on Pavitra Portal | प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुढची प्रोसेस कधी आणि काय असेल?
Exams

Process after Locking Preferences on Pavitra Portal | प्राधान्यक्रम दिल्यानंतर पुढची प्रोसेस कधी आणि काय असेल?

16 Feb 2024
Locking Preferences on Pavitra Portal | पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया
Exams

Locking Preferences on Pavitra Portal | पवित्र पोर्टल वर प्राधान्यक्रम लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया

6 Feb 2024
MH SET
Exams

MH SET 2024 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी

13 Jan 2024
MH SET
Exams

MH SET 2024 Eligibility & Qualifying Criteria | MH SET 2024 पात्रता आणि उत्तीर्ण होण्याचे नियम (निकष)

12 Jan 2024